Chandrapur च्या जिल्हाधिकऱ्यांना अटक करुन हजर करा, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे आदेश
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे आदेश... राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिला आयोगाने आदेश, जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी दाखल केली होती आयोगाकडे अपील, या प्रकरणात आयोगाने जिल्हाधिकारी यांना १६ फेब्रुवारी ला आयोगापुढे हजर राहण्याचे दिले होते आदेश मात्र आयोगापुढे जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाही, त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी झाल्या होत्या हजर, त्यामुळे आयोगाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून २ मार्च पर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे पोलीस महासंचालकांना आदेश, पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर ३६ वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा या पीडित आदिवासींचा आरोप आहे आणि या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे न्यायालयीन लढा, मात्र थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आयोगाने आदेश प्रशासनात मोठी खळबळ





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
