एक्स्प्लोर
Chandrapur :भाषणाची संधी न दिल्यानं अपक्ष आमदार Kishor Jorgewar यांची चंद्रपूर कृषी महोत्सवात नाराजी
चंद्रपुरात सुरु असलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनवेळी स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांची नाराजी उघडपणे दिसून आली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत रीतसर नाव असतानाही भाषणासाठी संधी न दिल्याने आमदार जोरगेवार चांगलेच संतापले.मात्र भाषणाची संधी न दिल्याने कृषी महोत्सवाच्या मंचावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या समक्ष जोरगेवार यांनी प्रशासन आपल्याला कमी लेखत असल्याची मनातली खदखद बोलून दाखवली.
आणखी पाहा























