Bhandara Dhan Kharedi Majha Impact : भंडाऱ्यात धान खरेदीत मोठ्या प्रमाणात अफरातफर
Bhandara Dhan Kharedi Majha Impact : भंडाऱ्यात धान खरेदीत मोठ्या प्रमाणात अफरातफर भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान दिवाळीपूर्वी खरेदी व्हावी, यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे होते. मात्र, अनेक जाचक अटींमुळे केंद्र चालकांनी पणन विभागाकडं प्रस्तावचं सादर केलेले नव्हते. अशात मागील वर्षी ज्यांच्याकडे खरेदीचे केंद्र होती, अशांचे प्रस्ताव तयार झालेले नसतानाही किंबहुना पणन विभागानं त्यांना धान खरेदीची परवानगी नसतानाही अनेकांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करून धानाची मोठी साठेबाजी करून ठेवली होती. लाखांदूर तालुक्यातील आसोला येथील *अनुष खरेदी केंद्रावर परवानगी पेक्षा अधिक धान खरेदी करून परवानगी नसतानाही शासनाच्या बारदाण्यात साठवून ठेवली जात होती, ही बातमी एबीपी माझा नं दाखविली होती.* यानंतर जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाल्यानं या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिलेत. या चौकशीत आसोला येथील *अनुष धान खरेदी केंद्र चालकाचे धान खरेदी केंद्र आहे, या लगत असलेल्या त्यांच्या आशीर्वाद राईस इंडस्ट्रीजच्या राईस मिलच्या दोन गोडाऊनमध्ये 96 लाख 5 हजार 200 रुपये किंमतीचा धानसाठा शासनाच्या 6 हजार कट्टा बरदान्यात आणि काही धान प्लास्टिक बारदाण्यात असा 4400 क्विंटल धानाची साठेबाजी केल्याचं उघड झालं आहे. यावर लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं बाजार समितीचा शेष चोरी आणि अवैध धान खरेदी करून साठेबाजी केल्याप्रकरणी 3 लाख 2 हजार 563 रुपयांचा दंड आकारला आहे.* याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी....
![Bhandara Pollution : भंडाऱ्यात उडणाऱ्या धुळीनं हवेची गुणवत्ता बिघडली, नागरिकांना विविध आजार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/31/52d70251cc86c9bb1b1ec04543634fcc173561955818990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![MVA Disputes : भंडारा मतदारसंघात शिवसेनेचं अस्तित्व नाही; काँग्रेसचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/21/e4b2ae2e28e32062f47cc620d195f29b1729486282913719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raju Karemore Viral Audio : राजू कारेमोरेंनी महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/30/6650b78b23625d69e251a89eba2770531727663334418719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/27/16dd9edc0c5d8845e6b95cca0232e645172744400686990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhandara Rishi Panchami:भंडाऱ्यातील पवणीच्या वैजेश्वर घाटावर भाविकांची पवित्र स्नानासाठी अलोट गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/08/7df5981e83cc7bc4dd2c59a55b4b23d31725785824151719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)