Pankaja Munde यांचा मंत्रिमंडळाच्या विस्तारावर टोला, माझी पात्रता नाही म्हणून मंत्रिपद दिलं नाही
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर पार पडला. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मौन सोडत माझी पात्रता नसल्याने मंत्रिपद दिलं नसेल असं म्हटलं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली नाही. नागपुरात पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर टाळलं. तर पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपवर निशाणा साधला. मुंडे परिवार आणि त्यांच्याशी जवळच्या ओबीसींवर नेहमीच अन्याय केला जातो, अशी टीका खडसे यांनी केली. तर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. पंकजा मुंडे नाराज नाही, असं ते म्हणाले.