Beed Old Man Death : 'कुणी घर देतं का घर'? म्हणत वृद्धाचा मृत्यू
शासनाच्या लालफितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असतं याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या आप्पाराव पवार या उपोषणकर्त्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच उपोषणकर्त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार काल घडलाय. दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर आज पारधी समाजाच्या संघटनांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. पारधी समाजातील वृध्दाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात झालेल्या मृत्यूला जिल्हाधिकारी जबाबदार की प्रशासनाची दिरंगाई? याची चौकशी करण्याची मागणी कुटूंबियांकडून करण्यात येत आहे.






















