Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करुन 500 रुपयांचा दंड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट बीडच्या परळी कोर्टाने अखेर रद्द केलं आहे. यासोबतच त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याविरुद्धचं वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर कोर्टाने दंड ठोठावून त्यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलंय... चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. चौदा वर्षांपूर्वीच्या एका राजकीय आंदोलनात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक वॉरंट निघाल्यामुळं राज ठाकरे बुधवारी बीडमधल्या परळी कोर्टासमोर हजर झाले. राज ठाकरे स्वतः परळी कोर्टासमोर हजर झाल्यामुळं त्यांचं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. यावेळी कोर्टाने राज ठाकरेंना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.























