एक्स्प्लोर
VIDEO | औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करावं, हर्षवर्धन जाधवांची राज ठाकरेंकडे मागणी | ABP Majha
१३ फेब्रुवारीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कन्नडचे माजी आमदार आणि नुकतेच स्वगृही परतलेले मनसे नेते हर्षवर्धन जाधव औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरुन आक्रमक झाले आहेत. औरंगाबादला शिवसेनेकडून कायमच संभाजीनगर असं संबोधलं जातं, मात्र राज ठाकरेंनी हा मुद्दा लावून धरावा अशी मागणी जाधवांनी केलीय. राज ठाकरेंचा दौरा आणि नामांतराची मागणी यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार हर्षवर्धन जाधव आहेत.
आणखी पाहा























