एक्स्प्लोर
Ambadas Danve : गटात सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मलाही फोन केला : अंबादास दानवे
गटात सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मलाही फोन केला होता असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी केलाय. एका मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. निवडणुकीच्या वेळी तुला मदत केली होती, अशी आठवणही शिंदेंनी करुन दिल्याचं दानवे यावेळी म्हणाले. मात्र, तुम्ही केलेली मदत ही शिवसेना पक्ष म्हणून केली होती, असं उत्तर एकनाथ शिंदेना दिल्याचं दानवेंनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहणार असल्याचं शिंदेंना सांगितलं, असंही दानवे म्हणालेत.
आणखी पाहा























