Navneet Rana Amravati : भाजपकडून उमेदवारी जाहीर; नवनीत राणांच्या डोळ्यांतून ओघळले अश्रू
Navneet Rana Amravati : भाजपकडून उमेदवारी जाहीर; नवनीत राणांच्या डोळ्यांतून ओघळले अश्रू राणांच्या उमेदवारीला महायुतीतून कडाडून विरोध झाला होता. शिवसेनेचे अडसूळ, प्रहारचे बच्चू कडू यांनी राणांना उमेदवारी देऊ नये अशी वारंवार मागणी केली होती. तरीही भाजपने हा विरोध दूर सारत राणांना उमेदवारी जाहीर केलीय. राणांनी भाजप प्रवेश करण्यासाठी आता आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. आमदार रवी राणा यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवलाय. रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष त्यांना निवडणुकीत पाठिंबा देणार आहे. नवनीत राणांची थेट लढत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्याशी होणार आहे. वंचितने अमरावतीतून २९ वर्षीय प्राजक्ता पिल्लेवाण यांना उमेदवारी दिलीय.























