एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Amravati Plastic Ban: अमरावतीमध्ये 4-5 ट्रक Plastic जप्त, 5 गोदामं सील
अमरावती महानगरपालिकेच्या प्लास्टिकमुक्ती अभियानाला गती देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या आदेशानं कडबी बाजार परिसरामध्ये मनपाच्या पथकानं कारवाई केली. या कारवाईत बंदी घातलेल्या प्लास्टिक साहित्याचा तब्बल चार ते पाच ट्रक इतका मोठा साठा जप्त करण्यात आला. इतकंच नाही तर तब्बल पाच गोदामं देखील सील करण्यात आली आहेत. पूर्वसूचना देऊन देखील अनेक व्यापारी बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिकेने ही कठोर कारवाई केली. प्लास्टिकमुक्ती अभियानांतर्गत ही मोठी जप्ती आणि सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या कारवाईमुळे प्लास्टिकचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांवर वचक बसेल अशी अपेक्षा आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























