Amravati Umesh Kolhe Case : उमेश कोल्हेंच्या हत्येचा सुत्रधार डॉ. युसूफ खान, तपास यंत्रणांचा दावा
Amravati Umesh Kolhe Case : उमेश कोल्हेंच्या हत्येचा सुत्रधार डॉ. युसूफ खान, तपास यंत्रणांचा दावा
अमरावती येथील मेडीकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला पशुवैद्यकीय डॉक्टर युसुफ खान हाच या हत्याकांडाचा कर्ताकरविता असल्याचा दावा एनआयएने विशेष न्यायालयात केला आहे.. डॉ युसूफ खान याच्या वकिलाने जामिनासाठी विशेष एनआयए कोर्टात याचिका दाखल केली आहे. या जामिनाला विरोध करताना एनआयए ने हा दावा केला. डॉ युसूफ हा तबलिगी जमातीचा सदस्य नव्हता सोबतच त्याच्या विरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत असा दावा युसुफच्या वकिलांनी केला. तर उमेश कोल्हेंच्या मेसेजचे स्क्रीनशॉट युसुफनंच काढले, आणि नुपुर शर्मांना लक्ष्य करण्यासाठी तरणांना प्रवृत्त केलं, असाही दावा एनआयएनं कोर्टात केला.























