एक्स्प्लोर
Amravati Hospital : अमरावतीत रुग्णालयातील आगीनंतर 10 दिवसांचं बाळ नाजूक असल्याने दगावलं
अमरावतीतल्या स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर बाजूलाच असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एका बाळाचा मृत्यू झालाय. स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागातल्या व्हेंटिलेटरला आग लागल्यानं खळबळ उडाली. या विभागात ३७ बालकं होती. आग लागल्यानंतर या बालकांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. या धावपळीत १० दिवसांचं एक बाळ दगावलं. ३४ आठवड्यांनी जन्मलेलं हे बाळ कमी वजनाचं होतं. त्याची तब्येत नाजूक होती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
आणखी पाहा























