एक्स्प्लोर
Amravati Jail Security Breach | अमरावती कारागृहात iPhone, मोबाईल आढळले, सुरक्षा चव्हाट्यावर
अमरावती कारागृहातील अंडा सेलमधील दोन कैद्यांजवळ आयफोनसह दोन मोबाईल फोन आणि दोन मोबाईल बॅटरी आढळल्याने खळबळ उडाली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी परवेझ दर्वेश खान आणि दस्तगीर गफ्फूर शहा यांच्या बराकीत हे मोबाईल सापडले. "कारागृहात राहूनही कैदी व्हिडिओ कॉल करत असल्याचं उघड झालंय." या घटनेमुळे अमरावती मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही कारागृहात गांजासारख्या वस्तू आढळल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आता तीन मोबाईल आणि दोन अतिरिक्त बॅटरी सापडल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रेजलपुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Amravati : अमरावतीमधील नेमक्या समस्या काय? नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा?
Amravati Plastic Ban: अमरावतीमध्ये 4-5 ट्रक Plastic जप्त, 5 गोदामं सील
Amravati Jail Security Breach | अमरावती कारागृहात iPhone, मोबाईल आढळले, सुरक्षा चव्हाट्यावर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























