एक्स्प्लोर
Palghar : Amit Thackeray पालघर दौऱ्यावर, जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज दुपारी त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या घरी जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतला . अमित ठाकरे आज पालघर दौरादरम्यान दुपारच्या वेळेस डहाणूतील नरपड येथे दाखल झाले असून मनसेचे कार्यकर्ते सचिन तांडेल यांच्या घरी त्यांच्या दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम आखण्यात आला होता . मात्र जेवताना पदाधिकाऱ्यांसोबत खुर्चीवर न बसता अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर बसून जेवण केलं .
आणखी पाहा
Advertisement
Advertisement














