Balasaheb Thorat : विखे पाटलांच्या दौऱ्याआधी बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव, सावरचोळ, पेमगिरीसह परिसरात अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात महसूलमंत्री विखे यांचा दौरा ठरला मात्र सकाळी विखे पाटील येण्याअगोदरच थोरात शेताच्या बांधावर पोहचले. दुपारी १२ वाजता थोरात यांचा दौरा सुरू झाला आणि तो संपण्यापूर्वीच विखे पाटील सुद्धा याच भागात पोहचले आणि पाहणी सुरु केली. बाळासाहेब थोरात ज्या शेताच्या बांधावर पाहणी करून गेले त्याच ठिकाणी, त्याच बांधावर विखे पाटलांनी टोमॅटो, डाळिंब, झेंडू सह नुकसान झालेल्या फळबागांची पाहणी केली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जाहीर टीका केली नसली तरी शाब्दिक चिमटे मात्र काढण्यास विसरले नाही. मात्र या सगळ्यापासून दूर शेतकऱ्यांना मात्र आपल्या नुकसानीची चिंता जास्त सतावत होती.























