(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Richa Chadha Controversy : गलवानचा उल्लेख करत रिचाने भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप
अभिनेत्री रिचा चड्ढा नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे किंवा ट्विट्समुळे चर्चेत असते. नुकतंच तिने एक केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.. गलवानचा उल्लेख करत रिचाने भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप रिचावर करण्यात येतोय.. उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या पीओके संदर्भातील विधानावर रिचाने ट्विट केलंय.. भारतीय सैन्य ही पाकव्याप्त काश्मीरला पुन्हा मिळवण्यासारखे आदेश अंमलात आणण्यास तयार असल्याचे द्विवेदी यांनी म्हटलं... त्यांचं हेच विधान शेअर करत रिचाने ‘गलवानने HI म्हटलंय’ असं ट्विट केलंय. रिचाने गलवानसंदर्भात अशा पद्धतीचं ट्विट करून भारत आणि चीनदरम्यान 2020 मध्ये झालेल्या गलवान संघर्षात शहीद जवानांच्या बलिदानाची खिल्ली उडवल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. भारतीय लष्कराबद्दलचं हे अत्यंत अपमानकारक ट्विट असल्याचं म्हणत अनेकांनी रिचावर राग व्यक्त केलाय...