(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SSR Suicide Case | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार की मुंबई पोलीस?
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या सुनावणीआधी रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये तिने स्वतः सोबत होणाऱ्या मीडिया ट्रायलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सुनावणी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार असून याप्रकरणाचा तपास कोण करणार यावर कोर्टाकडून निर्णय देण्यात येणार आहे. बिहार सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती विरोध करत आहेत. महाराष्ट्र सरकार मागणी करत आहे की, सीबीआच्या वतीने दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा.सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत मुंबई पोलिसांकडे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत करण्यात आलेल्या सुनावणीचा रिपोर्ट मागितला होता. तो पाहिल्यानंतर आणि सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट याप्रकरणी तपास कोण करणार, याचा निर्णय देणार आहे.