National Film Awards 2021 | 'हे' आहेत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते
नवी दिल्ली : 67व्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं आहे. चित्रपटगृहात रिलीज झालेला 'छिछोरे' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांनाही प्रचंड आवडला. तर नॉन फिचर चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हिंदी चित्रपट 'अॅन इंजिनियर्ड ड्रीम'ला मिळाला. याचं दिग्दर्शन हेमंत गावा यांनी केलं आहे. स्पेशल मेंशन पुरस्कारांमध्ये चार चित्रपट 'बिरियानी', 'जोना की पोरबा' (आसमिया), 'लता भगवान करे' (मराठी), 'पिकासो' (मराठी) यांनी बाजी मारली आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
