Kangana Ranaut vs Shiv Sena | ना डरूंगी, ना झुकूँगी.... मुंबईत येण्यापूर्वी कंगना रनौतचं ट्वीट
आज 9 सप्टेंबर कंगना रनौतने ट्वीटमध्ये सांगितल्याप्रमाणे आज ती मुंबईत दाखल होणार आहे. अशातच कंगनाच्या मुंबई दौऱ्यासाठी कंगनाला केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे.
आज सकाळी कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ती म्हणाली आहे की, 'राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान मी चित्रपटामार्फत जगले आहे. दुःखद गोष्ट म्हणजे, मला माझ्याच महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यात येत आहे. मी राणी लक्ष्मीबाईंच्या आदर्शांवर चालणार आहे. नाही घाबरणार, नाही झुकणार. अन्यायाविरोधात आवाज उठवत राहणार. जय महाराष्ट्र, जय शिवाजी'






















