West Bengal Trinmool Congress : पश्चिम बंगालमध्ये 221 जागा जिंकल्याचा तृणमूल काँग्रेसचा दावा
कोलकाता : देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. मात्र आधी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यासंदर्भात एएनआयनं ट्वीट केलं आहे. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.























