Sharad Pawar Congratulates Mamata : बंगालमधील यशाबद्दल शरद पवार यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
WB Election 2021 : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. निवडणूक निकालापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये भाजप दोन राज्यात, काँग्रेस एका, टीएमसी एका तर लेफ्टची सत्ता एका राज्यात येण्याचा अंदाज आहे. कोरोना काळातील या सर्व निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत पश्चिम बंगालची निवडणूक राहिली. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. या राज्यात टीएमसी आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. अशातच एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार असल्याचा अंदज वर्तवण्यात आला आहे.























