Lok Sabha Opinion Poll : महायुतीचं मिशन 45 स्वप्न भंगणार;महाराष्ट्रात महायुतीला 28 तर मविआला 20 जागा
आज लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या निवडणुकीत एनडीएला ३६६ ते इंडिया आघाडीला १५५ जागा मिळतील असा अंदाज एबीपी माझा आणि सी वोटरच्या सर्वेत समोर आला आहे. तसंच, महाराष्ट्रात महायुतीचं मिशन ४५ प्लसचं स्वप्न भंगणार असं आकडेवारी सांगतेय. एबीपी माझा- सी व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात महायुतीला २८ तर महाविकास आघाडीला २० जागा मिळतील. एबीपी माझा आणि सी व्होटरने हा सर्वात मोठा ओपिनियन पोल केला. त्यानुसार प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात महायुतीचं मिशन ४५ चं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नाही. राज्यात भाजपला २२, शिंदे आणि अजित पवारांना ६ जागा मिळतील असं या सर्व्हेत दिसतंय. काँग्रेसला ४, तर ठाकरे आणि पवारांना १६ जागा मिळतील असं ओपिनियन पोलमध्ये दिसतंय.























