Maharashtra FYJC Admission 2021 : आजपासून मिशन अॅडमिशन, 14 ते 22 ऑगस्ट दरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदत
मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा रद्द केल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. आजपासून म्हणजे १४ ऑगस्टपासून सकाळी अकरा वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे. तर अकरावीची प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार आहे. कोरोनामुळं यंदा दहावी बोर्डाची परीक्षा न झाल्यानं अंतर्गत मुल्यमापनावर निकाल लागलाय. त्यामुळं सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना ८५ ते ९९ टक्के गुण मिळाले आहेत. परिणामी पसंतीच्या कॉलेजसाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चढाओढ असणारआहे.


















