एक्स्प्लोर
Deepali Chavan Suicide : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस.रेड्डी यांचं अखेर निलंबन
अमरावती : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचं अखेरीस निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच्या निलंबनाची मागणी जोर धरत होती. एम.एस. रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्रसंचालक आहेत. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली होती. अखेरिस आज त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली होती. याच प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















