Mahadev Gite Wife : कारागृहातील मारहाणीचं प्लॅनिंग तीन दिवस आधीच झालेलं, महादेव गित्तेच्या पत्नीचा दावा
Mahadev Gite Wife : कारागृहातील मारहाणीचं प्लॅनिंग तीन दिवस आधीच झालेलं, महादेव गित्तेच्या पत्नीचा दावा
महादेव गित्ते याने जेल प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनंतर त्याची पत्नी मीरा गित्ते यांचे वाल्मीक कराड गँगवर आरोप
कारागृहातील मारहाणीची प्लॅनिंग तीन दिवस आधीच करण्यात आली असल्याची दिली माहिती
महादेव गित्ते याने जिल्हा कारागृहाच्या प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनंतर त्यांची पत्नी मीरा गित्ते यांनी वाल्मीक कराड यांच्यासह गँगवर गंभीर आरोप केले आहेत.महादेव गित्ते यांनी बीड कारागृहात झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज तक्रारीत मागितले आहेत ते प्रशासनाने द्यायलाच पाहिजेत याला वेळ का लागत आहे.कारागृहातील मारहाणीची प्लॅनिंग तीन दिवस आधीच केली गेली होती. एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून गित्ते यांच्यावर दहा जणांनी हल्ला केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि परळीतून जेलमध्ये गेलेले आरोपी यांनी ही मारहाण केली होती.यावेळी तुम्ही सध्या मध्ये आहेत म्हणून वाचलात नाहीतर तुमचे हाल संतोष देशमुख याच्यापेक्षा वाईट करून तुम्हाला मारलं असत अशी धमकी महादेव गित्तेच्या पत्नीने सांगितलं आहे.
वाल्मीक कराड याला जेलमध्ये ज्या सुविधा मिळत आहेत त्याला गित्ते विरोध करत होते म्हणूनच हा मारहाणीचा प्रकार झाला आहे.
बापू आंधळे खून प्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव 302 मध्ये घेतले पाहिजे.या प्रकरणातील सर्व आरोपींच्या गुन्ह्याची तपासणी केली पाहिजे.मी आज बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून जेलमधील मारहाणीच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहे.याच बाबतीत महादेव गित्ते याच्या पत्नीसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी....























