एक्स्प्लोर
सांगली सोने कारागीर आत्महत्येप्रकरणी 8 सराफांविरोधात गुन्हे, फसवणूक, मानसिक त्रास दिल्याचा आरोप
पैशाच्या तगाद्यामुळे सांगलीतील 82 वर्षीय हरीचंद्र नारायण खेडेकर या सोने कारागीर वृद्धाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी 8 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खेडेकर यांच्या कुटुंबातील सोनें कारागीर करणाऱ्याचा आणि काही सराफी व्यावसायिकाचा समावेश आहे. हरीचंद्र नारायण खेडेकर, यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती ज्यात फसवणूक, धमकी आणि आर्थिक नुकसान, मानसिक त्रासातून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. या चिठीच्या आधारे आणि खेडेकर यांच्या मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आणखी पाहा























