Gold Rate Hike 56000 : सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ, प्रतितोळा दर 56 हजारांवर ABP Majha
पौष महिना सरताच आता लगीनसराई सुरू होईल मात्र लग्नाचे वेध लागलेल्यांना आणि त्यांच्या पालकांना सोन्याचे दर मात्र घाम फोडणार आहेत... एकीकडे मंदीचे सावट आहे तर दुसरीकडे सोनं मात्र दिवसेंदिवस वधारत आहे. सध्या सोन्याचे दर 56 हजार 883 रुपयांच्या उच्चांकी दरावर पोहोचले आहेत. लग्नसराईमुळे सोन्याची मागणी देखील दिवसें-दिवस वाढत चालिये. कोरोनाकाळात सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार रुपयांवर पोहोचले होते. मात्र इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार 16 जानेवारी रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळता 56 हजार 883 रुपये प्रतितोळा एवढा झालायं.सोन्यसह चांदीनंही चांगलाच भाव खाल्लाय. चांदीचा दर 69 हजार 167 रुपयांवर पोहोचलाय























