पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा होणाऱ्या जावायाला सल्ला, उत्तर काय मिळाले वाचा..
क्रिकेटच्या मैदानावर धुवांदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे लग्न लवकरच होणार आहे.
क्रिकेटच्या मैदानावर धुवांदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे लग्न होणार आहे. शाहिद आफ्रिदीचा जावई इतर कोणी नाही तर पाकिस्तान क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी आहे. स्वत: शाहिद आफ्रिदी यांनी याबाबत माहिती दिली.
शाहिद आफ्रिदी यांनी ट्वीट केलंय की, "शाहीनच्या कुटुंबाने संपर्क साधला, दोन्ही कुटुंबे बोलत आहेत. प्रत्येकाची जोडी स्वर्गात बनते. अल्लाची इच्छा असेल तर दोघेही भेटतील. माझ्या शुभेच्छा शाहीनसोबत आहेत."
Alhumdulillah. Thanks Lala for your prayers. May Allah SWT make things easier for everyone. You are the pride of entire nation. https://t.co/xfQYnb0ONZ
— Shaheen Shah Afridi (@iShaheenAfridi) March 7, 2021
शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटला उत्तर देताना शाहीनने लिहिले की, "लाला आपल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद." अल्लाह सर्वांसाठी गोष्टी सोप्या करेल. तुम्ही देशाचा अभिमान आहात.
बातमीनुसार शाहिनचा विवाह शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्षासोबत होणार आहे. शाहिद आफ्रिदीला एकूण पाच मुली आहेत. सर्व मुली नेहमीच लाइमलाइट दूर राहिल्या आहेत.
PSL स्पर्धेत शाहिन आणि आफ्रिदी दोघेही सहभागी शाहिद आफ्रिदी आणि शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळत होते, कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने 2018 मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या तो तिन्ही फॉर्मेटमध्ये पाकिस्तान संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे.
कसे होते करिअर? पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 15 कसोटी सामन्यांत 48 बळी घेतले असून एका डावात 5/77 अशी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याने 22 एकदिवसीय सामन्यात 45 बळी मिळवले आहेत. या प्रकारात त्याने दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आफ्रिदीने 21 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24 बळी घेतले आहेत.