एक्स्प्लोर

JEE Main 2021 Result Released: जेईईचा फेब्रुवारी सेशनचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

देशभरात झालेल्या JEE Main 2021 फेब्रुवारी परिक्षेनंतर 10 दिवसात विद्यार्थ्याचा निकाल जाहीर.देशातून 6 विद्यार्थी फेब्रुवारी सेशनच्या परीक्षेत टॉपर्स.

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या JEE Main 2021 फेब्रुवारी सेशनचा परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 26 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊन ही परिक्षा घेतली गेली. यासोबतच JEE Main 2021 परीक्षेचा फेब्रुवारी सेशनचा निकाल अवघ्या दहा दिवसांमध्ये जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी तीन भाषांमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा यावर्षी तेरा भाषांमध्ये घेण्यात आली होती.

देशभरातून 6 लाख 20 हजारांच्या जवळपास विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. त्यातील सहा विद्यार्थी हे देशातून या परीक्षेत 100 पर्सेंटाइल (NTA score) मिळवून टॉपर आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रतून सिद्धार्थ मुखर्जी या विद्यार्थ्याने सुद्धा या सहा टॉपर्समध्ये आपले स्थान मिळविले आहे. याशिवाय संकेत जहा, (राजस्थान), प्रवीण कटारिया (दिल्ली), रंजीम दास (दिल्ली), गुरमीत सिंग (चंदिगड), अनंत किंदबी (गुजरात) या विद्यार्थ्यांनी सुद्धा 100 पर्सेंटाइल गुण मिळवून देशात टॉपर्सचे स्थान मिळवले आहे.

कोरोना प्रादुर्भाव विचारात घेता यावर्षी विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी या परिक्षेसाठी मिळावी म्हणून यंदा JEE Main 2021 परीक्षा चार महिन्यांमध्ये म्हणजेच 4 सेशनमध्ये घेतली जातीये. यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चार महिन्यात ही परीक्षा विद्यार्थ्यांना आपली बोर्ड परीक्षेचा वेळापत्रक पाहून व त्या प्रकारे नियोजन करून देता येणार आहे. विद्यार्थी ही परीक्षा 4 सेशनमध्ये कोणत्याही सेशनमध्ये अर्ज भरून देऊ शकतात. मात्र 4 सेशनमध्ये ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण त्या परीक्षेत मिळालेले गुण अंतिम गुण म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.

जेईई मेन 2021 चा निकाल पाहण्यासाठी या पायऱ्यांचे अनुसरण करा

  • विद्यार्थ्यांना सर्वप्रथम jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
  • होम पेजवर दिलेल्या रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • उघडलेल्या नवीन पृष्ठावरील आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आपला निकाल आपल्या समोर येईल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget