(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saina Nehwalच्या भूमिकेत दिसणार Parineeti Chopra; बायोपिकचा ट्रेलर रिलीज
Saina Nehwalच्या भूमिकेत अभिनेत्री Parineeti Chopra दिसणार आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं 'सायना' बायोपिकचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये परिणीती चोप्रा सायना नेहवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आपला आगामी चित्रपट 'सायना'मध्ये दिसून येणार आहे. अभिनेत्री बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये फारशी अॅक्टिव्ह नव्हती. कदाचित याचं कारण गेल्या वर्षी लागू करण्यात आलेला लॉकडाऊनही असू शकतो. अशातच परिणीती चोप्राच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर आज म्हणजेच, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये परिणीती सायना नेहवालची भूमिका साकारताना दिसणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर या महिन्याच्या शेवटी सायना नेहवालवर आधारित बायोपिक लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.
पाहा ट्रेलर :ट्रेलर बाबत बोलायचे झाले तर सुरुवातीला मेघना मलिक ज्या सायनाच्या आईची भूमिका साकारणार आहेत, त्या हरियाणवी एक्सेंटमध्ये चिमुकल्या सायनाला बॅडमिंटन स्टार बनवण्याचं स्वप्न दाखवत डायलॉग बोलताना दिसत आहे. परिणीती चोप्रा ट्रेलरमधील अनेक दृश्यांमध्ये परिणीती सायनाच्या सावलीप्रमाणे दिसत आहे. परंतु, हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशातच अभिनेत्री परिणीती चोप्राने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 'आजच्या दिवशी म्हणजेच, जागतिक महिला दिनाच्या दिवशी मी स्वतःला भाग्यशाली समजते की, मला सायनाची भूमिका साकारता आली.'
SAINA???????????? This women's day I am proud to bring to you - SAINA???????????? In cinemas 26th March. Watch the trailer now - https://t.co/Egh5NSWJyI@NSaina #AmoleGupte #ManavKaul @eshannaqvi #BhushanKumar @deepabhatia11 @Sujay_Jairaj @raseshtweets #KrishanKumar @AmaalMallik
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) March 8, 2021
दरम्यान, हा चित्रपट होळीच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट प्रेक्षकांसाठी 26 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. 'सायना' चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलं आहे. चित्रपटाचं संगीत अमाल मलिक यांनी दिलं आहे. यापूर्वी अमाल मलिक यांनी 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्येही संगीत दिलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :