Baburao Pacharne Passes Away: शिरूर, हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन
शिरुर, हवेली तालुक्यात सुरुवातील भाजपचं फार कमी काम होतं मात्र बाबूराव पाचर्णे यांनी दोन्ही तालुक्यात भाजपचं उत्तम काम केलं. राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या दोन्ही तालुक्यात भाजपची ताकद वाढण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
Baburao Pacharne Passes Away: शिरुर आणि हवेलीचे आमदार माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचं दुख:द निधन झालं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाचर्णे यांनी चार वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र कर्करोगामुळे त्यांनी राजकारणामधून विश्रांती घेतली होती. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. काही दिवसांपुर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार पोपटराव गावडे यांचा पराभव केला होता.
भाजपची ताकद वाढवण्यात मोलाचा वाटा
शिरुर, हवेली तालुक्यात सुरुवातील भाजपचं फार कमी काम होतं मात्र बाबूराव पाचर्णे यांनी दोन्ही तालुक्यात भाजपचं उत्तम काम केलं. राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या दोन्ही तालुक्यात भाजपची ताकद वाढण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी त्यानंतर भाजप या सगळ्या पक्षामधून त्यांनी कार्य केलं आहे.
गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय
दोन्ही तालुक्यात भाजपचं वर्चस्व निर्माण करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता. अनेक भाजप नेत्यांशी त्यांची चांगली जवळीक होती. दोन दिवसांपुर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली होती. गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय होते.
राजकीय कारकीर्द
- 1995 साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली ही निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली होती.
- त्यानंतर 1999 साली काँग्रेसने त्यांना तिकीट दिले. त्यानंतर त्यांना यश मिळाले .
- 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि पुन्हा एकदा विधानसभेत निवडून आले.
- 2009 साली त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. परंतु पुन्हा एकदा उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली मात्र त्यावेळी त्यांना यश मिळू शकले नाही.
- 2014 साली त्यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक जिंकली.
- त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुन्हा एकदा पराभव झाला होता .
- त्यानंतर कर्करोगामुळे त्यांनी राजकारणामधून विश्रांती घेतली होती.