Zero Hour : वरळी हिट अँड रन ते बच्चू कडूंची तिसरी आघाडी;झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषण
Zero Hour : वरळी हिट अँड रन ते बच्चू कडूंची तिसरी आघाडी;झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषण
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत अनेक उलथापालथी घडल्या.. चार प्रमूख पक्षांचे ६ पक्ष झाले.. आधी २ पक्षांची युती, आता ३ पक्षांची महायुती झाली.. दोन प्रमुख विरोधकांची आघाडी, आता तीन पक्षांसह महाविकास आघाडी म्हणून ओळखली जाते.. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात आणखी एक आघाडी उभी राहण्याची शक्यताय.. तिसरी आघाडी.. लोकसभा निकालांनंतर महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती अभूतपूर्व आहे.. तिकीट नाकारल्यामुळे असलेली नाराजी.. हक्काची जागा दुसऱ्याला गेली म्हणून झालेलं मानापमान.. पूर्ण न झालेल्या मागण्यांमुळे सरकारच्या मित्रपक्षांतच असलेलं विरोधातलं वातावरण.. पक्षांतर्गत सुरू असलेल्या कूरघोड्या.. ही सध्याची स्थितीये... त्यामुळेच विभागले गेलेलेे पक्ष, कार्यकर्ते आणि गटांची खिचडी ही तिसऱ्या आघाडीसाठी फारच पोषक अशी म्हणता येईल... त्यामुळेच की काय, सत्तेत असूनही वारंवार डावलले गेल्यामुळे.. नाराज असलेले प्रहार संघटनेचे प्रमूख आमदार बच्चू कडू, महायुतीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा जोरात आहे.. नुकतीच त्यांनी पुण्यात संभाजीराजे छत्रपतींच्या, स्वराज्य पक्ष शिबिराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.. यावेळी बच्चू कडूंनी संभाजीराजेंसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहितीये.. याशिवाय शेतकरी नेते रविकांत तूपकर आणि आम आदमी पार्टीही बच्चू कडूंसोबत एकत्र येऊन, तिसरी आघाडी म्हणून विधानसभा एकत्रितरित्या लढवण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतंय.. आजच बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना, शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी.. सकारात्मक निर्णय न घेतल्यास तिसऱ्या आघाडीचा विचार करू असा थेट इशाराच दिलाय.. पाहूयात.