Zero Hour : शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने भरला अर्ज ; राजकीय वर्तुळात खळबळ
Zero Hour : शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने भरला अर्ज ; राजकीय वर्तुळात खळबळ बातमी राजकीय नेत्याची... पण आपल्या राज्यातील नव्हे तर शेजारच्या.. कर्नाटकमधून... हादरवून ठेवणारी... सत्तेचा माज काय असू शकतो ह्याचे किळसवाणे उदाहरण.. माजी पंतप्रधानांचा मुलगा आणि नातूवर सेक्स स्कँडलचा आरोप.. जो आहे एनडीएचा लोकसभेचा उमेदवार.. त्या बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोतच.. पण तिथे वळण्याआधी, सुरूवात करुया महाराष्ट्रातील राजकीय बातमीने... सत्ता कोणाला नकोय ...अनेक साधू संतांनाही राजकारणाची मेनका खुणावत असते हे आपण बघितलंय.. असंच एक उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळालं.. स्वामी शांतिगिरी महाराजांंनी, गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केल्यानंतर आज पुन्हा एक अर्ज भरला.. आणि नवा ट्विस्ट निर्माण झाला.. कारण शांतिगिरी महाराजांनी पक्षाच्या नावापुढे शिवसेना असं लिहिलं.. महायुतीकडून अद्याप जागा कुणाला? उमेदवार कोण? हे ठरलेलं नाही.. अशातच स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.. अर्ज भरल्यावर शांतिगिरी महाराजांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया...