Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
नागपूरचे नाव 'दीक्षाभूमी करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची सुरुवात नागपुरातून झाल्याने हे नामांतर त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नामांतरासंदर्भात प्रस्ताव आणल्यास आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकीकडे दादरच्या नामांतराची मागणी जोर धरत असताना आणि त्यावरून वाद निर्माण झाला असताना या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी ही नवी मागणी करत सरकारला एकप्रकारे आव्हान दिले आहे.शिवाय, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात प्रस्ताव आणल्यास पाठिंबा देण्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. सोबतच उद्धव ठाकरेंनीही याला पाठिंबा दर्शवला असल्याचेही ते म्हणालेय. त्यामुळे आता नामांतराचा वाद पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


















