Zero Hour : जम्मू -काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांची घोषणा
Zero Hour : जम्मू -काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांची घोषणा
जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली.. कलम तीनशे सत्तर हटल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. तिथे अठरा सप्टेंबर, पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान पार पडेल तर हरियाणात एकाच टप्प्यात एक ऑक्टोबरला मतदान असेल. या दोन्ही राज्यांची मतमोजणी चार ऑक्टोबरला असेल. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली. सर्वांचं लक्ष असलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांबाबतही त्यांनी भाष्य केलं.. पावसाळा, गणेशोत्सव, पितृ पक्ष, नवरात्र आणि दिवाळी या कारणांमुळे जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घेणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.. त्यामुळे ४ ऑक्टोबरनंतरच महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होईल आणि दिवाळीनंतरच मतदान आणि मतमोजणी होईल या आपल्या बातमीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.