Zero Hour : महाराष्ट्रात राजकीय प्रचार सभांचा मेगा शो; मोदींवर विरोधकांचा घणाघात
Zero Hour : महाराष्ट्रात राजकीय प्रचार सभांचा मेगा शो; मोदींवर विरोधकांचा घणाघात भाजपनं चारसो पारचा नारा दिलाय.. तर त्याला महाराष्ट्रातून कडवं आव्हान मिळताना दिसतंय.. गेल्या दोन वर्षांत दोन पक्ष फुटीनंतर, राज्यात सध्या सहानुभूतीची लाट असू शकते .... सातत्याने २०१४ आणि २०१९चा यशस्वी फॉर्म्युला - म्हणजेच मोदींचा चेहरा, मोदींचे नाव आणि मोदींची लाट - हे उभे करण्याचा प्रयत्न एकटा भाजपाच नव्हे तर एकनाथ शिंदे, अजितदादा आणि अगदी राज ठाकरेही करत आहेत ...पण आता प्रश्न आहे कि कुठली लाट जिंकणार ? सहानुभूतीची कि मोदींची? देशातील दुसऱ्या क्रमांकांचं सर्वाधिक लोकसभा जागा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे ह्या ४०० पार च्या नाऱ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचे. आणि म्हणूनच कि काय यंदा मोदींनी राज्यात सभांचा धडाका लावलाय. दुसरीकडे स्वत: उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रमुख विरोधकांची भूमिका बजावतायत.. राज्यभर आव्हानं उभी करतायत.. त्यामुळेच आता मोदीही, अनेक सभांमधून.. वारंवार... उद्धव ठाकरेंचा पक्ष म्हणजे नकली शिवसेना असल्याचा उल्लेख करतायेत ... त्याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरेंनी मोदींना मत म्हणजेच विनाशाला मत असे म्हटले. त्यातूनच नव्या संघर्षाचा भडका उडालाय... त्याच संघर्षात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना एक सवाल केलाय.