Zero Hour Guest Center : राहुल गांधींचा सांगली दौरा, चर्चा ठाकरेंच्या गैरहजेरीची
Zero Hour Guest Center : राहुल गांधींचा सांगली दौरा, चर्चा ठाकरेंच्या गैरहजेरीची
मुंबईत ठाकरे गटाच्या २२ जागांवरील उमेदवारांची एक यादी चर्चेत राहिली, जालन्यात मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरुन चर्चा झाली, तर राहुल गांधींची सांगली भेट आणि त्याला उद्धव ठाकरेंची दांडी याची सुद्धा चर्चा झाली.. झीरो अवरची सुरुवात आपण करणार आहोत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या सांगली दौऱ्याच्या बातमीने.. राहुल गांधी सकाळी नांदेडच्या नायगावात पोहोचले, तिथे त्यांनी काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, चव्हाण कुटुंबीयांचं राहुल गांधींनी सांत्वन केलं. त्यानंतर ते सांगलीच्या कडेगावात पोहोचले.. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण पार पडलं, यावेळी मल्लिकार्जून खरगे ,शरद पवार, विश्वजीत कदम यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती... उपस्थित नव्हते ते महाविकास आघाडीतील तिसऱ्या प्रमुख पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे.. सांगलीतील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली दिसली.. या कार्यक्रमातील भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राजकोट पुतळा प्रकरणावरुन मोदींनी मागितलेल्या माफीची त्यांनी एकप्रकारे खिल्लीच उडवली..
सगळे कार्यक्रम
![Zero Hour : Bhiwandi Corporation : महापालिकेचे महामुद्दे : भिवंडीतील कामवारी नदी मृत्यूशय्येवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/ed244796d787a4777c34b3d0e97394b217395537810871000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/c48bb4a05c4b8270d492f411635a3a0117395537571591000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/cea4ed15e08067ab33377cdc770a2ff217395536829411000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a0c0536298d4a5535ed194b42671c573173947121015190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/2ccd28aa0d105b8711a3264b0b251010173946975247990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)