Zero Hour Full :डोंबिवलीतील स्फोट ते महाराष्ट्रातील टंचाई;राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे विश्लेषण
नमस्कार मी विशाल पाटील... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत... आजच्या भागात आपण तीन महत्वाचा बातम्या पाहणार आहोत.. पहिली बातमी डोंबिवलीतील विनाशकारी स्फोटाची.. डोंबिवली एमआयडीसीमध्ये काल दुपारी झालेल्या स्फोटानंतर बचावकार्य आजही सुरु आहे.. इतकंच नाही तर आज दुपारपर्यंत इथं कालपासून सुरु असलेली आग धुमसत होती.. दुर्घटनेत मृत्यूचा आकडा वाढत होता.. तसं नेत्यांची रीघही लागली होती. याच स्फोटाचे अनेक पैलू आपण पाहणार आहोत..
त्याबरोबर आपण दुसरी महत्वाची बातमी पाहणार आहोत.. ती आहे महाराष्ट्रावरच्या पाणी टंचाईची...ज्या निवडणुकांवर देशाचं भविष्य अवलंबुन आहे.. त्याच निवडणुकांवर अलंबुन आहे राज्यातल्या शेकडो जनतेचा पाणी प्रश्न...
आता तुम्ही म्हणाल की दोन्हींचा काय संबंध.. तर सांगतो.. राज्यात निवडणूक आचारसंहिता सुरु आहे.. त्यामुळे नव्यानं आर्थिक योजनांची घोषणा करणं शक्य नाहीय... आणि आता महाराष्ट्रातील पाण्याचं संकट पाहिलं .. तर नव्यानं घोषणा आणि आधीच जाहीर झालेल्या घोषणा पूर्णत्वास नेण्याची गरज आहे.. त्यावर महाराष्ट्र सरकारनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती.. मात्र, त्यावर आज निर्णय आलेला नाहीय.. म्हणजे सरकारसमोरची आव्हानं वाढण्याची शक्यता.. याच बातमीसोबत आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील ग्राऊंड झीरोवरुन दुष्काळाची दाहकता दाखवणार आहोतच..
आणि तिसरी महत्वाची बातमी असेल तरी पुण्यातून.. जिथं पोर्शा कार धडक प्रकरणात अनेक अपडेट्स पुढे आलेत.. त्यावरुन राजकारणही पेटलंय.. आणि पुण्यात बारचालकांनी आंदोलनंही केलीएत.. कोर्टानंही नवा आदेश दिलाय.. या सगळ्या बातम्यांचं विश्लेषण करणार आहोतच.. मात्र, सुरुवात करुयात आजच्या प्रश्नानं.. जो आहे डोंबिवलीतील दुर्घटनेवर...
All Shows

































