एक्स्प्लोर

Zero Hour : विधानसभेसाठी महायुती-मविआच्या बैठका ते नक्षलमुक्त उत्तर गडचिरोली, 'झीरो अवर'मध्ये चर्चा

झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण पूर्ण होण्याआधीच.. राज्यात विधानसभांना वेग आलाय.. कारण, अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आलीय.. आणि त्यामुळेच राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी आपआपल्या पद्धतीनं कामाला सुरुवात केलीय...
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस पक्षासह जवळपास प्रत्येक राजकीय पक्षानं चाचपणी सुरु केलीय.. आणि राजकीय बैठकांनी जोर धरलाय.. 
भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक आहे.. आणि उद्या महाराष्ट्र प्रभाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक असेल...तिकडे आजच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडलीये.. तर आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पक्षांच्या बैठकांचा धडाकाच लावलाय.. ज्याची सुरुवात पिंपरीमधून झालीये... महायुतीच्या बैठकांचं विश्लेषण करणार आहोतच.. त्याचसोबत आपण महाविकास आघाडीमधील बैठकांचं सत्रही सांगतो..
जिथं शरद पवारांनी कालपासूनच अजित पवारांसोबतच्यांना पुन्हा पक्षात घ्यायला सुरुवात केलीये.. तिथं काँग्रेसनं लोकसभेच्या यशाची विधानसभेत पुनरावृत्ती करण्यासाठी दिल्लीत विषेश बैठकांचं आयोजन केलंय.. तर उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यापासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु केल्यात.. 
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी.. दोन्ही आघाड्यांमधील प्रत्येक पक्षाच्या बैठकीत... विधानसभेच्या जागांवरुन दावेदारी सुरु झाल्याचंही समोर येतंय.. प्रत्येक पक्ष आमूक एक आकडा सांगतोय.. त्यावरुनही संघर्ष होवू शकतो का? की आकड्यांच्या चर्चा फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यापुरत्याच आहेत.. या सगळ्याची चर्चा करणार आहोतच..  मात्र, सुरुवातीला आजचा पहिला प्रश्न... त्यासाठी जावूयात पोल सेंटरला...

आता बातमी पराक्रमाची.. नक्षल्यांच्या खात्म्याची.. 
कालची रात्र गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात महत्वाची ठरणारे... कारण, संततधार पाऊस... नदी नाल्यांना पूर... आणि सी - ६० जवानांच्या तुकडीचा भीम पराक्रम... 
काल, रात्री गडचिरोली जिल्ह्यात सी-६० कमांडोंनी बारा नक्षलवाद्यांचा खात्मा केला... जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता.. त्यामुळे कारवाई मोठी आव्हानात्मक होती..   याबद्दल आज गडचिरोली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली... कालच्या कारवाईनंतर उत्तर गडचिरोलीत तब्बल 35 वर्षांनंतर सशस्र नक्षलवाद मुक्त झालाय... तिथं आता एकही सशस्त्र नक्षलवादी उरलेला नाही, अशी अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिलीये. नक्षली शहीद सप्ताहच्या अनुषंगाने नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती... नक्षल्यांच्या खात्म्यानंतर जेव्हा सी सिक्स्टी पथक गडचिरोली पोलीस मुख्यालयात सुखरूप पोहोचले.. तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं... या ऑपरेशनमध्ये सहभागी सर्व २०० जवानांना, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ दिला...
1980 पासून नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 605 नागरिकांचा बळी गेलाय.. तर 242  पोलिसांना वीरमरण आलं... तसंच आतापर्यंत कमांडोंच्या धडक कारवाईत 344 नक्षलवादी ठार झाले असून, 500 पेक्षा जास्त नक्षल्यांनी सरेंडर केलंय... आणि घटनांचा आकडा पाहिला तर तो आहे.. 3 हजार 192 ..
यावरुनच लक्षात येतं की कालची मोहीम किती महत्वाची.. कालची नक्षलवाद्यांविरोधातली मोहीम कशी पार पडली... मोहिमेत किती जवान होते.. किती आव्हानात्मक होती ही मोहीम... हे सगळं आपण जाणून घेणार आहोत.. पण आता पाहुयात कालच्या धडक कारवाईचा एक मोंटाज...

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चाAmbani Ganpati Celebration : अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणरायाचं आगमन, बॉलीवूडकरांकडून बाप्पाचं दर्शनEknath khadse Special Report : महायुतीचं सरकार जावो, मविआ येवो : एकनाथ खडसेManoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Basmati Export: बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Embed widget