Zero Hour : दोन शिवसेना समोरासमोर मुंबईच्या तख्ताची लढत कोण जिंकणार? ABP Majha
डोंबिवली : मशालीने हुकूमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. मोदीजी तुम्ही 10 वर्ष सत्तेत होतात आणि आज तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा आला आहे. असा गद्दाराला गाडा की, पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये, असंह उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी डोबिंवली येथील सभेमध्ये हे वक्तव्य केलं आहे.
मशालीने हुकूमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय...
उद्धव ठाकरे म्हणाले, या मशाली पेटलेल्या आहेत. मशालीने हुकूमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. वैशाली ताई आता तुमची जबाबदारी आहे. गद्दाराच्या विरुद्ध मला निसटता विजय नकोय. असा गद्दाराला गाडा की, पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण-डोंबिवलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना केलं आहे.