एक्स्प्लोर

Zero Hour : सरकारी बंगल्यांवरुन राजकीय मानापमान; ते मंत्रिपदी बढती,अधिकाऱ्यांची झाडाझडती

तुम्ही पाहाताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर. 

मंडळी, महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारून आता जवळपास दोन दिवस झालेत. नवे मंत्री म्हटलं की नव्यानं मिळणारा बंगला येतो. आणि त्या बंगल्यांच्याच वाटपावरून मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

मुंबईत मंत्र्यांसाठी एकूण ४२ बंगले आहेत. हे ४२ बंगले तीन परिसरांमध्ये वसलेले आहेत. पहिला अर्थातच मलबार हिल, दुसरा पेडर रोड आणि तिसरा नरीमन पॉईंट म्हणजे मंत्रालयाच्या समोर.
 
मलबार हिल आणि पेडर रोडवरील बंगले अधिक प्रशस्त आहेत. वर्षा, देवगिरी, नंदनवन, रॉयलस्टोन, रामटेक, ज्ञानेश्वरी, शिवगिरी, पर्णकुटी ही त्याची काही उदाहरणं. तर मंत्रालयासमोरचे बंगले तुलनेनं लहान आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थातच वर्षा बंगला मिळाला आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदनवन बंगल्यातच राहणार आहेत. गेल्या सरकारमध्ये अजित पवारांकडे देवगिरी बंगला होता, यापुढेही त्यांनी देवगिरी बंगल्यात राहणं पसंत केलंय. 

आज चर्चेमध्ये असणारा बंगला म्हणजे रामटेक. हा बंगला खरं तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आला होता. पण पंकजा मुंडेंनी या बंगल्यात राहण्याची आपली इच्छा बावनकुळेंकडे व्यक्त केल्याचं कळतं. बावनकुळेंनीही त्याला लगेच होकार दिला अशी चर्चा आहे. पंकजा यांचं या रामटेक बंगल्याशी भावनिक नातं आहे. कारण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे मंत्री असताना रामटेक बंगल्यावर राहायचे. 

रामटेक हा सर्व सरकारी बंगल्यांमधला सर्वात सुंदर बंगला मानला जातो. या बंगल्याच्या लॉनवरून थेट समुद्र पाहण्याचा आनंद घेता येतो. रामटेकपासून हाकेच्या अंतरावर फडणवीसांचा सागर बंगला आहे. अर्थात, फडणवीस आता काही दिवसच सागरवर असतील, मुख्यमंत्री या नात्यानं त्यांना आता वर्षावर शिफ्ट व्हावं लागेल. 

दरम्यान, सरकारी बंगल्यांवरून यंदा जाहीर रस्सीखेच झाली नसली तरी त्याची चर्चा कायमच होत असते. त्यावरच आहे आजचा आमचा दुसरा प्रश्न. त्यावरील प्रतिक्रिया आपण काही वेळानं पाहणारच आहोत, पण त्याआधी प्रश्न पाहूयात, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
Embed widget