एक्स्प्लोर

Zero Hour Amit Thackeray Mahim Vidhan Sabha : राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडून येणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती ती, आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? अखेर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मनसेच्या तिकीटावर मुंबईच्या माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना, मनसे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या दृष्टीनं माहीम मतदारसंघाला अनेक कारणांंनी ऐतिहासिक महत्व आहे. पहिलं कारण म्हणजे शिवसेनेचा जन्म हा दादरच्या कदम मॅन्शनमध्ये झाला होता. दस्तुरखुद्द राज ठाकरे हेही कदम मॅन्शनमधल्या त्याच घरात लहानाचे मोठे झाले. तिथूनच त्यांनी आपला मुक्काम हा आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ निवासस्थानी हलवला.  शिवसेनाप्रमुख या नात्यानं बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा शिवाजी पार्कवर पार पडली होती. त्यानंतर ३९ वर्षांनी राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सभा शिवाजी पार्कवरच घेतली होती. ही दोन्ही ठिकाणं माहीम मतदारसंघात मोडतात. शिवसेना भवन, मनसेचं राजगड हे कार्यालय आणि राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ हेही याच मतदारसंघात आहेत.  अमित ठाकरेंच्या रुपानं ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. २०१९ साली आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे हेही आमदार आहेत, पण त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला होता, म्हणजे प्रत्यक्ष जनतेतून निवडून येण्याचा मार्ग त्यांनी तेव्हाही स्वीकारला नव्हता.  अमित ठाकरेंना तिकीट मिळालं तर महायुती किंवा ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाही अशा चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र तसं झालं नाही. माहीममधून शिंदेंच्या शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळं मनसेचा एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नव्हता. तसंच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीच्या राहुल शेवाळे यांना माहीम मतदारसंघात आघाडी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंना प्रश्नही विचारण्यात आला, पाहूयात त्यांनी काय उत्तर दिलं. 

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget