Uran Crime Special Report : उरण दुर्घटनेतील आरोपीच्या अटकेसाठी लोकांचा उद्रेक
Uran Crime Special Report : उरण दुर्घटनेतील आरोपीच्या अटकेसाठी लोकांचा उद्रेक रण येथे 22 वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेत शनिवारी मृतदेह आढळून आला. तरुणीची हत्या करुन तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली. तिचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळल्या. यशश्री शिंदे ही तरुण केल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. तरुणीचा शोध सुरु असतानाच तिचा मृतदेह आढळला. याप्रकरणी मृतदेह सापडून दोन दिवस उलटून गेले तरी, आरोपीवर कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे उरणमधील संतप्त नागरिकांना प्रशासनाचा निषेध करत मोर्चा काढला आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. यशश्री शिंदेंची हत्या करत मृतदेहाची बिटंबना उरणमधील येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदे 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच तिचा छन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला. उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपामध्ये यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करून बॅाडी टाकण्यात आली होती. हत्या होऊन तीन दिवस झाले तरी, मारेकऱ्यांना पकडण्यात उरण पोलिसांना यश आलेलं नाही. यामुळे संतप्त झालेल्या उरणवासियांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी पोलीसांविरोधात घोषणाबाजी करीत आरोपीला त्वरीत अटक करून फाशी देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. उरणकरांचा निषेध मोर्चा उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी उरणमध्ये मोर्चा काढण्यात आला. गेली दोन दिवस झाले, तरी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. यशश्री शिंदे 25 जुलैपासून बेपत्ता होती. उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उरणमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे. 25 जुलैपासून ही तरुणी बेपत्ता होती. तर 27 जुलैला उरणमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्राने वार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अगद्याप मोकाट असल्याचे त्याचा निषेध म्हणून उरणकरांनी आज निषेध मोर्चा काढला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? यशश्री शिंदे बेलापूरमध्ये एका कंपनीत कामाला होती आणि उरणमध्ये तिच्या कुटुंबियांसह राहत होती. 25 जुलै रोजी ती सकाळी कामाला जाण्यासाठी निघाली होती, मात्र तेव्हापासून ती बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि यशश्री बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस यशश्रीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळीत झाडीत एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि गुप्तांगावर जखमा होत्या. कुटुंबियांनी या मृतदेहाची ओळख पटवली. या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. दाउद शेखवर हत्येचा आरोप यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, तरुणीवर बलात्कार झाला होता की नाही हे वैद्यकीय चाचणीनंतर समोर येईल. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार केली असून आरोपी बंगळूरला पळाल्याचं सांगण्यात येत आहे.