Suresh Dhas VS Jitendra Awhad| जितेंद्र आव्हाडांना सुरेश धसांचा राग का आला? Special Report
आणि आता पाहाणार आहोत दोन आमदारांमध्ये सुरु असलेला कलगीतुरा..
हे आमदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार सुरेश धस.
परवापर्यंत हे दोन्ही आमदार एकाच मंचावरुन धनंजय मुंडेंवर सडकून टिका करत होते. पण परभणी लाँगमार्च स्थगित झाल्याने चिडलेल्या आव्हाडांनी धसांवर गंभीर आरोप केले आहेत. धसांनीही त्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे.
या वादाची पार्श्वभूमी आणि हा वाद कोणत्या दिशेला जाणार याचा अंदाज घेऊयात.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
हे विचित्र हातवारे, अंगविक्षेप करत बोलणारे आहेत अर्थातच आमदार जितेंद्र आव्हाड.. आणि ते नक्कल करतायत आमदार सुरेश धस यांची.. गेले दोन दिवस जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यात टोकाचं वाकयुद्ध सुरु आहे.
या कलगीतुऱ्याचं तात्कालिक कारण आहे सुरेश धसांच्या शिष्टाईने स्थगित झालेला परभणी ते मुंबई लाँगमार्च. त्यात धसांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आव्हाडांच्या टिकेला धार आली. विशेष दुतांनी जाणीव पूर्वक लॉंग मार्च चिरडला अशी टीका आव्हाडांनी सुरु केली. हा प्रश्न धसास लावणारा दलाल कोण असं सूचक ट्विटही केलं
जितेंद्र आव्हाडांच्या या टिकेला सहन करतील ते सुरेश धस कसले.. त्यांनी आव्हाडांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.
(( मी संतोष देशमुख आणि सुर्यवंशी यांच्यात कोणताही फरक केला नाही.. जे माझ्यावर टीका करतात
कुटुंबियांना मी अडिच वाजता जाऊन भेटलो..
विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून दिली..सरकारकडून 10 लाखांच्या मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले.. + आम्ही शाहु फुले आंबेडकर मानणारे आहोत वगैरे))
गेले ६० दिवस सुरेश धसांंनी संतोष देशमुख प्रकरण लावून धरलं, त्यानंतर शेजारच्या परभणीतही सोमनाथ सूर्यवंशीसाठी आवाज उठवला. खरंतर या दोन्ही प्रकरणात अनेक नेते होते मात्र सर्वाधिक चर्चा होती सुरेश धसांची.. धसांचा आवेश एवढा होता की मनोज जरांगेंचा करिश्मा सुद्धा काही काळ फिका पडला. त्यावरुनही आव्हाडांनी धसांवर टीका करत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली
आव्हाडांच्या आरोपांना धसांनी उत्तर दिलंय. मनोज जरांगे आपलं दैवत असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.
जाती जातीत भांडण लावणाऱ्या नेत्यांवर मला प्रश्न विचारू नका. - जरांगे पाटील बाबत प्रश्न विचारू नका ते आमचे दैवत आहे R SKYPE SURESH DHAS PC 100225))
संतोष देशमुख प्रकरणात सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर आले होते.. धनंजय मुंडेंवर आणि सरकारवर यथेच्छ टीका करत होते. परभणी प्रकरणी मात्र आव्हाडांनी धसविरोधी पवित्रा घेतला आहे. कितीही नाही म्हंटलं तरी यात राजकारण आहेच आणि श्रेयवादाची लढाई सुद्धा आहे. मात्र ही लढाई सामाजिक एकोप्यासाठी नक्कीच चांगली नाही एवढं स्वतःला जनतेचे कैवारी म्हणवून घेणाऱ्यांना कळू नये हीच मोठी शोकांतिका...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































