Thackeray Brothers Alliance : युती भावाशी, लढाई 'देवा'शी; युती ठाकरेंची,तलवार मराठीची Special Report
Thackeray Brothers Alliance : युती भावाशी, लढाई 'देवा'शी; युती ठाकरेंची,तलवार मराठीची Special Report
होणार होणार म्हणता म्हणता अखेर घोषणा झालीच... होय... ठाकरे बंधूंनी अखेर युतीची घोषणा केलीय... ठाकरे ब्रँड मराठीसाठी आणि मुंबईसाठी नेमकं काय काय करणार आहे यावर ठाकरे बंधूंनी जोरदार बॅटिंग केली... मात्र एका प्रश्नाचं उत्तर दोन्ही ठाकरेंकडे नव्हतं.. कोणता होता तो प्रश्न... पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट
जवळपास सहा महिने आधीच ते एकत्र आले होते...
रखडली होती ती युतीची अधिकृत घोषणा
अखेर ठाकरे बंधूंना त्या घोषणेसाठी मुहूर्त सापडलाच..
फक्त निवडणुकांपुरतं नव्हे ,तर मनापासून आम्ही एकत्र आलो आहोत... हे दाखवण्याचा दोन्ही ठाकरे कुटुंबाकडून प्रयत्न सुरू होता
आधी उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्यसह राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर पोहोचले..
शिवतीर्थवरून दोन्ही ठाकरे बंधू एकाच कारनं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर पोहोचले..
बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना देखील दोन्ही ठाकरे कुटुंबांनी आपल्याला एकोपा अधोरेखित करण्याची संधी साधली
जे ऐकण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे कान आसुसले होते...
All Shows

































