Thackeray Brother Alliance : राजकीय 'गोळाबेरीज', ठाकरे बंधू एकत्र आले तर जास्त फायदा कुणाचा? Special Report
Thackeray Brother Alliance : राजकीय 'गोळाबेरीज', ठाकरे बंधू एकत्र आले तर जास्त फायदा कुणाचा? Special Report
तर आगामी महापालिका निवडणुका या ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. नाशिक वगळता मनसेन स्थापनेपासून सत्ता बघितलेली नाही. त्यामुळे मनसेला फार फरक पडणार नाही. पण मुंबई महापालिकेतली सत्ता गेली तर उद्धव ठाकरेंची अवस्था जास्त बिकट होणार आहे. राज्यात सत्ता नाही, केंद्रात सत्ता नाही, शहरातही सत्ता नसेल तर मग उरला सुरला पक्ष टिकवण्याचा आव्हान त्यांच्या समोर असेल. तिकडे महायुतीकडून सन्मानजनक प्रस्ताव आला नाही तर राज ठाकरे महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे. सोबत जाण्याचा विचार करू शकतात. अशा स्थितीमध्ये मुंबई, ठाणे आणि नाशकातल्या सेना मनसे ताकदीचा आढावा घेऊया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा माध्यमात आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे दोघे भाऊ एकत्र आले तर त्याचा महानगरपालिका निवडणुकीवर किती आणि कुठे प्रभाव पडेल याची गणित सुद्धा मांडली जात आहेत. मनसेची जी काही थोडीफार शक्ती आहे त्यात मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे ही नावं डोळ्यासमोर येतात. त्यातही शिवसेनेप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच महत्त्व वेगळं आहे. 2012 साली बीएमसी मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते. पण 2017 साली ती संख्या सात वर आली. पुढे या सात पैकी सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेने सोबत गेले. मनसे सोबत थांबलेले एकमेव नगरसेवक संजय तुरडे यावेळी शिंदेंच्या शिवसेने सोबत जाणार असल्याची. चर्चा आहे. शिवसेनेतील फोटीनंतर 40 नगरसेवकांनी एकनाथ शिंदें सोबत राहण्याला पसंती दिली. त्यामुळे दोन्ही ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा हा जर प्रवास तुम्ही पाहिलात तर हे अप्स अँड डाऊन प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या त्यांच्या त्या त्या काळामध्ये आलेले आहेत. तसच आमचा हा पक्ष नवीन पक्ष आहे. नुकता स्थापन झालेला राजठाकरे साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर स्थापन केलेला एक पक्ष आहे स्वतःच्या हिमतीवर. वडिलो पार्जीत वारशाने आलेला पक्ष नाहीये तुम्ही बघताय ज्या पद्धतीने 2014 पासून महाराष्ट्राच्या राजस्थानाचा चिखल झाला त्या चिखलामध्ये आपण पाय टाकायचा की नाही टाकायचा हा प्रत्येक पक्षाचा एक व्यक्तिगत मत असत त्यांना या राजकीय चिकलापासून दूर राहणं हे त्यांनी नेहमी कटाक्षाने पाहिलेल आहे किंवा त्या चिकलापासून कसं आपण वेगळं राहू आणि आपला वेगळेपणा कसा दाखवून देऊ हा. त्यांनी सातत्याने तो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे काही डाऊन आले त्याचे कारण विरोधी पक्षाची जी काही लाट आहे मोदी लाट आहे ही कारणणीभूत आहे. ह्या राजकीय घडामोडी प्रत्येक पक्षाच्या वाट्याला त्या त्यांच्या त्यांच्या राजकीय प्रवासात आलेले आहेत. त्याचाच एक भाग आहे. आता लोकांना हळूहळू हे कुठेतरी रिलाईज होतय की हा सगळा आभास आहे. हा सगळा देखावा आहे. प्रत्यक्षात काम करणारी लोकही निवडून न येता कोणी. लाटेवर सवार होऊन निवडून आलेली लोकप्रतिनिधी आहेत तर प्रत्यक्ष काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून येणं गरजेच आहे अशी ही लोकांची आताची जनतेची जनभावना आहे. मुंबई खालोखाल ठाणे जिल्ह्याने ठाकरे या नावाची ताकद पाहिली ठाणे महानगरपालिका ही दोन्ही पक्षांच्या दृष्टीन अत्यंत महत्त्वाची. याच महानगरपालिकेपासून एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली होती आणि आजही ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच वर्चस्व कायम आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी. ठाणे महानगरपालिका ही प्रतिष्ठेची लढाई असेल तर दुसरीकडे मनसेने देखील आधी झालेल्या लोकसभा आणि पालिका निवडणुकीत तसच आताच्या विधानसभा निवडणुकीत चांगली मत मिळवलेली आहेत. ठाणे महानगरपालिकेत 2007 साली मनसेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. तर 2012 साली सात. 2017 साली मात्र मनसेला भोपळा सुद्धा फोडता आला नव्हता. दुसरीकडे शिवसेनेचे 2007 साली 48 नगरसेवक निवडून आले होते. तर 2012 साली 53. आणि 2017 साली 64 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती थोडीशी नाजुक आहे. 2017 च्या एकूण 67 नगरसेवकांपैकी केवळ तीनच नगरसेवक हे सध्या ठाकरें सोबत आहेत तर उरलेले सर्व नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालीच तर ठाण्यामध्ये या दोन्ही पक्षांना ऑक्सिजन मिळू शकतो. मुंबई ठाण्या खालोखाल नाशिक हा शिवसेना आणि मनसे दोन्हीचा. गड राहिला. दोन्ही पक्षांनी नाशिकमध्ये सत्ता प्रस्थापित केली होती. मात्र भाजपाच्या रणनीती पुढे दोन्ही पक्षांची ताकद कमी पडते. नाशिकरांनी राज ठाकरेंवर भरभरून प्रेम केलं. इतक की 2012 साली नाशिकात मनसेचे तीन आमदार आणि 40 नगरसेवक निवडून दिले होते. नाशिक महापालिकेवर मनसेने आपला झेंडा फडकवला होता. हे सांगितलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. 2017 च्या निवडणुकीत मात्र नाशिकरांनी मनसेची संख्या. ठाकरेंची ताकद कमी झाली, याउलट 2017 च्या निवडणुकीत भाजपाचे तब्बल 66 नगरसेवक विजयी झाले, नाशकात पहिल्यांदाच भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती. शक्तिशाली नेते आपल्या पक्षात उडण्यासाठी महायुतीतील प्रत्येक पक्षाने जोर लावला. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर नाशिकर पुन्हा आपलं प्रेम आणि मत त्यांच्या पारड्यात टाकतील असा विश्वास मनसेला वाटतोय. जनतेला महाराष्ट्रातील एक विरोधक. तगडा पाहिजे, त्यासाठी राज साहेब, उद्धव साहेब हे दोघही बंधू, भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला ठोशास ठोसा देणारे दोघ भाऊ आहे. आणि यांच्या मागे जनता आहे. आज जरी भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष बोलत असले, दोघं भाऊ एकत्र आल्यावर काय होणार आहे, तुम्हाला माहित नाही काय होणार आहे. 100% येणार. महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, नगरपंचायती, याच्यामध्ये दोन्ही भावांची सत्ता येणार आहे. मुंबई, ठाणे असो की नाशिक, दोन्ही ठाकरेंचा फोकस मराठी अस्मिता, परप्रांत्यांचा मुद्दा असेल, भाजप म्हणजे गुजरात धारणा किंवा उत्तर भारतीय धारजिणा पक्ष अशी मांडणी दोन्ही ठाकरे करतायत. तो प्रचार मोडून काढण्यासाठी फडनवीस शिंदे आणि अजित दादांना मेहनत करावी लागेल. ठाकरेंच्या एकत्र येण्याची चर्चा सोपी असली तरी हा... त्याच पुढे काय होणार हे कळायला काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे.
All Shows

































