spy Jyoti Malhotra | ज्योती मल्होत्राच्या जबाबात काय? ज्योतीनं दिली गद्दारीची कबुली Special Report
पाकिस्तानची हेर ज्योती मल्होत्राची सध्या तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरु आहे. पण आता तिनं केलेल्या एकेक कारनाम्यांची कबुली देण्यास सुरुवात केली आहे. जगभर फिरण्यासाठी आणि अय्याशीसाठी तिनं चक्क आपल्या देशासोबत गद्दारी केली याचा कबुलीनामा तिनं दिलाय. पाहूयात ज्योतीच्या गद्दारीची संपूर्ण कहाणी...
ज्योती मल्होत्राच्या ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलवरचे हे व्हीडिओ
या व्हीडिओची व्याप्ती फक्त व्लॉगपुरती मर्यादीत नाहीय..
तर हे व्हिडीओ म्हणजे....
पाकिस्तान, चीन, बाली आणि इतर देश हिंडताना ज्योतीची कशी ऐश सुरू होती, याचा जिवंत पुरावा आहेत..
आणि याच अय्याशीसाठी ज्योतीनं मायभूमीशी म्हणजेच भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसलाय..
तपासयंत्रणांना दिलेल्या कबुलीजबाबात, ज्योतीच्या गद्दारीची संपूर्ण कहाणी समोर आलीय..
ज्योती आणि आयएसआयचे कनेक्शन उजेडात आले असले तरी तिने नेमकी कोणती माहिती शत्रूंना दिली आहे हे बाहेर आलेलं नाही..
चिंतेची बाब म्हणजे ज्योती मल्होत्रानं व्हीडिओ तयार करण्यासाठी संवेदनशील भागांचा दौरा केल्याचं तपासात निष्पन्न झालंय.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ज्योती मल्होत्रा राजस्थानमधल्या भारत पाकिस्तान सीमेवरच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचली होती
तिकडे तिने एक रात्र मुक्काम देखील केला होता
मुनाबाब हे भारतातलं सीमेवरचं शेवटचं रेल्वे स्थानक आहे..
प्रशासनाच्या परवानगीशिवाय बाहरेच्या व्यक्तीला तिथं सहज जाता येत नाही
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं थार एक्स्प्रेस बंद केली
मात्र थार एक्स्प्रेस सुरू करण्याची भाषा ज्योती तिच्या व्हीडिओमध्ये करताना दिसतेय..
त्यामुळे पाकिस्तानशी असलेली तिची नाळ या व्हीडिओमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालीय
दरम्यान ज्योतीच्या या व्हिडीओची राजस्थान सरकारनं गंभीर दखल घेतली आहे
All Shows

































