Shivaji Maharaj Statue Malvan : राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याजवळचा भाग खचला Special Report
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.. त्यानंतर महायुती सरकारनं पुन्हा त्याच जागी पुतळ्याची उभारणी केली. मात्र आता शिवरायांचा पुतळा उभारला त्या चबुतऱ्याजवळचा भाग पावसामुळे खचला... त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. तर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत सरकारला पुन्हा कोंडीत पकडण्याचं आवाहन केलंय...
Z:1606SINDHUDURGArajkot killa update vis n wkt
११ मे २०२५....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण झालं...
पण या नव्या पुतळ्याचं बांधकामही आता वादाचं कारण ठरलंय...
याच कारण पुतळ्याच्या चबुतऱ्याशेजारचं हे खचलेलं बांधकाम...
((व्हिज्युअल मोंटाज... ट्रीट करुन खचलेला भाग दाखवा))
रविवारी १६ जूनला चबुतऱ्याच्या बाजूचा हा भाग खचला...
ही बाब स्थानिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली...
त्यानंतर खचलेल्या भागात भराव टाकून
सार्वजनिक बांधकाम विभागानं हा भाग बुजवला...
पण शिवप्रेमींनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली...
बाईट - स्थानिक ०१
बाईट - स्थानिकांचे ०२
धक्कादायक बाब ही जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात
राजकोट किल्ल्यावर येत पाहणी केली होती...
त्यावेळी याठिकाणी एक भेग पडलेली जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली होती...
पण मालवणमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पुतळ्याजवळचा हा भाग खचला...
पण हा भाग पुन्हा खचण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय...
बाईट : अनिल पाटील, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
((Z:1606SINDHUDURGAcollector byte))
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत
मुख्यमंत्र्यांनी कोकण प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना
तात्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले...
मुख्य अभियंता शरद राजभोज तातडीनं मालवणात पोहोचले
आणि त्यांनी पाहणी केली...
मात्र यावेळी उपस्थित शिवप्रेमींच्या रोषालाही त्यांना सामोरं जावं लागलं....
((घोषणाबाजी....))
बाईट - शरद राजभोज, मुख्य अभियंता, कोकण प्रादेशिक विभाग
((घटनेचा अहवाल करणार मुख्यमंत्र्यांना सादर करणार.दोषींवर कारवाई करण्याची आश्वासन))
((Z:1606SINDHUDURGAshivaji maharaj putala pahani))
दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर राजकारणही रंगलं...
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत थेट टीकास्त्र सोडलं....
बाईट - संजय राऊत, खासदार
((रवींद्र चव्हाणांनी अरबी समुद्रात उडी मारावी))
बाईट - वैभव नाईक, माजी आमदार
((छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळी आमच्यावरती आरोप केले.राम सुतार यांनी केलेली मूर्ती सुंदर आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम केले ते पूर्णपणे बोगस काम केले.))
बाईट - विनायक राऊत, माजी खासदार
((पुन्हा एकदा राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. ४ महिन्यांपूर्वी पुतळा कोसळला नव्याने १०० कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या बाजुला भगदाळ पडले आहे. पुन्हा एकदा महाराजांचा अपमान भ्रष्टाचार करून केला जातो आहे...))
विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर
सत्ताधाऱ्यांनी या सगळ्या प्रकारावर काय उत्तर दिलं ऐका...
बाईट - आशिष शेलार, मंत्री, भाजप
बाईट - दीपक केसरकर, आमदार
((Z:1606SINDHUDURGADEEPAK KESARKAR))
४ डिसेंबर २०२३ ला नौदल दिनानिमित्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत
पहिल्यांदा राजकोट किल्ल्यावर भव्य पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं...
पण दुर्दैवानं हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला...
शिवप्रेमींचा संताप झाला... प्रशासन खडबडून जागं झालं....
अखेर दहा महिन्यात कोट्यवधी रुपये खर्चून पुन्हा हा पुतळा उभा राहिला...
खुद्द मुख्यमंत्र्यांनी याचं लोकार्पण केलं...
पण महिनाभरात चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली
आणि नवा वाद उभा राहिला....
पण सुदैवाची बाब ही की चबुतरा आणि पुतळा दोन्ही सुरक्षित आहेत...
((पुतळ्याचे क्लोज - ड्रोन व्हिज्युअल दाखवून एन्ड करा...))
सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग
All Shows

































