Santosh Radda Gold : मित्राकडून टीप चोरट्यांकडून डल्ला; चोरीचा ट्रेस मिळाला, पण सोनं अजूनही गायब Special Report
Santosh Radda Gold : मित्राकडून टीप चोरट्यांकडून डल्ला; चोरीचा ट्रेस मिळाला, पण सोनं अजूनही गायब Special Report
संभाजीनरगमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललंय...दरोड्यात तब्बल ५५० तोळं सोनं चोरीला गेलं होतं...त्यापैकी फक्त तोळं सोनं सापडलंय...बाकीचं सोनं गेलं कुठं आणि दरोडेखोरांना सोन्याची टीप दिली कुणी याची उत्सुकता आहे...त्यातच आता लड्डांचा बालपणीचा मित्रच घरभेदी बनल्याचं समोर आलंय...याप्रकरणी मित्रासह आणखी काही जणांना अटक करण्यात आलीय...
संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या घरी पडलेल्या दरोड्याची अखेर उकल झालीय.
विशेष म्हणजे लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेनेच त्यांचा केसाने गळा कापल्याचं समोर आलंय. संतोष लड्डा आणि बाळासाहेब इंगोले यांनी एकत्र शिक्षण घेतलं होतं. मात्र क्षुल्लक रागातून बाळासाहेब इंगोलेने आपल्या मित्रालाच दगा दिला. पोलिसांनी आता या प्रकरणात एकूण १० जणांना अटक केलीय.
पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी बाळासाहेब इंगोलेसह किराणा दुकान व्यावसायिक आजिनाथ जाधव, गणेश गोराडे, मेडिकल दुकानचालक महेश गोराडे आणि देवीदास शिंदे यांना अटक केलीय. यातील इंगोलेने दरोडेखोरांना सोन्याची आणि पैशांची टीप दिली होती असं तपासात समोर आलंय.
GFX IN
बाळासाहेब इंगोलेचं
लड्डांच्या घरी
येणं-जाणं होतं.
इंगोलेनं आजिनाथ जाधवला,
जाधवने गणेश गोराडेला
टीप दिली.
गणेश गोराडेकडून
महेश गोराडेला
सोन्यासंदर्भात टीप मिळाली.
तिथून ही माहिती
महेश गोराडेकडून
देविदास शिंदेला देण्यात आली.
GFX OUT
इंगोले लड्डांच्या घरी जाताना भाजीपाला न्यायचा. तसंच २० वर्षांपासून इंगोले लड्डांच्या कंपनीत कटिंग इनचार्जच्या पदावर होता. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात काही कारणांवरून लड्डा इंगोलेला ओरडले होते. त्याचा राग मनात धरून इंगोलेने टीप दिल्याची माहिती आहे. मित्राचाच केसाने गळा कापणारा बाळासाहेब इंगोले कोण आहे पाहूया
GFX IN
कोण आहे इंगोले? HEADER
बाळासाहेब चंद्रकांत इंगोले
हा संतोष लड्डांचा
वर्गमित्र आहे.
लड्डांच्या कंपनीत
बाळासाहेब इंगोले
कटिंग इनचार्ज होता.
20 वर्षांपासून
बाळासाहेब इंगोले
लड्डांच्या कंपनीत आहे.
बाळासाहेब इंगोले
लड्डांच्या घरी भाजीपाला
वगैरे न्यायचा
लड्डांच्या घरातल्या
पैशाची,सोन्याची
इंगोलेला माहिती होती.
GFX OUT
दरम्यान या चोरीला कारणीभूत ठरला तो एक क्षुल्लक कारणावरचा राग...
GFX IN
का रागावला होता इंगोले लड्डांवर? HEADER
काही महिन्यांपूर्वी
संतोष लड्डांच्या
वडिलांचं निधन झालं.
इंगोले कंपनीत
न सांगताच लड्डांना
भेटायला गावी गेला.
गैरहजर इंगोलेला
कंपनीतून अनेक
कॉल आले,
पण त्याला त्यांनी उत्तर दिलं नाही
काही दिवसांनी
इंगोलेने कॉल करणाऱ्यालाच
शिवीगाळी केली.
इंगोलेच्या शिवीगाळीची
लड्डांना सव्वा
महिन्यानंतर माहिती मिळाली.
कॉल करणाऱ्या वडीलधाऱ्याशी
असे वागतो का? म्हणून
लड्डांनी इंगोलेला जाब विचारला.
लड्डांनी कॉल करणाऱ्या
वडीलधाऱ्याची माफी
मागण्याची इंगोलेला सूचना करण्यात आली.
माफी मागायला
सांगितल्याचा बाळासाहेब
इंगोलेला राग आला.
हा राग मनात धरुन
इंगोलेने लड्डांच्या घरच्या
सोन्याची टीप दिली.
GFX OUT
मात्र हा खटला उकलला असला तरी लड्डांना मिळालेलं केवळ २० तोळे सोनं हे अजूनही गौडबंगाल आहे. उरलेलं ५३० तोळे सोनं गेलं कुठे याचा शोध लागलेला नाही... या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात अटक झालेला योगेश हसबे हा आरोपी पोलिसांना हप्ते देत होता अशी माहिती समोर आलीय. २०२३ मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या हप्तेखोरीची यादी जाहीर केली होती. त्यानुसार हसबे हा संभाजीनगर पोलिसांना अवैध दारू विक्रीसाठी २० हजारांचा हप्ता देत होता असं नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणातला संशय आणखी वाढलाय. आता पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली तसंच सर्व सोनंही तातडीने शोधून काढावं, नाही तर या प्रश्नांमुळे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यातच राहील
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
























