Operation Kellar Jammu | 'ऑपरेशन केलर'मध्ये 3 दहशतवाद्यांंना कंठस्नान, ऑपरेशन केलरची इनसाईड स्टोरी
Operation Kellar Jammu | 'ऑपरेशन केलर'मध्ये 3 दहशतवाद्यांंना कंठस्नान, ऑपरेशन केलरची इनसाईड स्टोरी
भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर जम्मू आणि काश्मीरमधलं वातावरण थोडं शांत झाल्याचं चित्र होतं. मात्र याचदरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा आपल्या कुरापती सुरु केल्या. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा तणाव वाढला. मात्र भारतीय सैन्यानं जम्मूच्या शोपियानमध्ये राबवलेल्या 'ऑपरेशन केलर'मध्ये तीन दहशतवाद्यांंना कंठस्नान घालण्यात आलं. काय आहे या ऑपरेशन केलरची इनसाईड स्टोरी... पाहूयात
शाहीद कुट्टे... आणि अदनान शफी... जमू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईत मारले गेलेले हे दहशतवादी... या दोघांसह आणखी एक दहशतवादी भारतीय सैनिकांनी ठार केला पण या घटनेनं पाकिस्तानचं शेपूट वाकडंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं...
कसं होतं 'ऑपरेशन केलर' -------------------------------------- शोपियानच्या केल्लरमध्ये दहशतवादी लपल्याची सैन्याला गुप्त माहिती गुप्त माहितीच्या आधारे सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध लपलेले दहशतवादी लष्कर ए तोयबा संघटनेचे असल्याची माहिती शोपियानच्या जंगलात दहशतवादी आणि भारतीय सैन्य आमनेसामने दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्यावर गोळीबार भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
All Shows

































